विश्वाचा प्रवास - अव्यक्तांतिल दूरदूरच्या श...
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.
अव्यक्तांतिल दूरदूरच्या शांत गुहेंतून
दिव्ययोगिनी रजनी झाली गगनीं अवतीर्ण,
जगदव्यापिनी काव्यकल्पना कविहृदयामधुनी
जेंविं अवतरे शब्दसृष्टिच्या मधु वातावरणीं -
दिशादिशांतुनि तेविं प्रगटली छायारूपानें
गभीर मूर्तीं निशादेविची, कोण न हें जाणे ?
अर्पुनिया हें सुवर्णरंगी सूर्यकमल पायीं
त्या भगवतिची करिते पूजा निसर्गदेवी ही.
लाक्षारस चर्चिला, गुलालहि भरला भांगांत,
रम्य तारकाफुलें उधळलीं स्तुतिगीतें गात.
सप्तलोक दशदिशा अप्सरा सुर वदती सारे
‘उदोउदो’, ब्रम्हांड दुमदुमे त्या जयजयकारें !
अपूर्ण
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP