नि:श्वास - हे सौंदर्यध्वंसी काला । भ...
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.
हे सौंदर्यध्वंसी काला । भीति दाविसी काय ? कुणाला ?
विद्युत्पातासह कडकडूनी । कडेकडे जा टाक फोडुनी.
गर्वराशि हा गभीर भूधर । ने पाताळीं तुला हवा तर;
क्षुब्धाब्धीच्या लाटांमधुनी । धांव जिभाळ्या चाटित गगनीं,
गर्मगळित ती तारा - बाला । बळी तुझ्या घे हत जठराला.
परी प्रीतिचा न्यारा वारा । खबरदार आडवितां याला ।
नाजुक मी ललना फुलवेल । प्रेमहि माझें काय मलूल;
अशा विचारीं मूढा हृदया । क्षणाक्षणां धडधडसी वायां.
प्रेमरक्षणीं दक्ष देवता । अव्यक्त जगीं करिती सत्ता.
प्रलयवज्र कीं कृतान्त तोही । सामर्थ्यें अवगणिला त्यांहीं.
पड्त्या स्त्रीहृदयाचा तोल । त्याच देवता सांवरतील.
भीति कशाची आणि कुणाला । पहा जगा, ललनेची लीला ।
चला सरा सुमनांनो दूर । हातीं प्रेमा समशेर
उग्ररूपिणी शिवा भवानी । प्रीतिदेवते, उत्तरे भुवनीं,
क्षुद्र मूषका काळा मूढा । पसर तुझ्या त्या कराल दाढा ! -
अपूर्ण
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP