मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
विष्णुमय जग वैष्णवांचा धर...

बैष्णव धर्म - विष्णुमय जग वैष्णवांचा धर...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म
संतजनीं वर्म सांगीतलें.
तयांचें भजन घडो अहर्निश
माझ्या मीपणास आग लागो.
पर - उपकारीं वेंचो सर्व शक्ति
हेचि माझी भक्ति पामराची.
सर्वही आघात येवो मजवरी
सुखी राहो मजवरी
सुखी राहो परी देव माझा.
नको स्वर्गवास जनधनकीर्ति
प्रेमाची संपत्ति प्रेमरूप.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP