औदुंबर - ऐल तटावर पैल तटावर हिरवाळ...
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.
ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन
निळासांवळा झरा वाह्तो बेटाबेटांतुन.
चार घरांचें गांव चिमुकलें पैल टेकडीकडे;
शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गरदी पुढें.
पायवाट पांढरी तयांतुन अडवीतिडवी पडे;
हिरव्या कुरणांमधुन चालली काळ्या डोहाकडे.
झांकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर;
पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP