मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
मना दैन्य दौर्बल्य हें पा...

राष्ट्रसेवा - मना दैन्य दौर्बल्य हें पा...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


मना दैन्य दौर्बल्य हें पाहवेना,
मना हिंदभूची व्यथा साहवेना;
मरे घोर अज्ञान हें दुर्विकारी,
मना राष्ट्रशिक्षांजनें त्या निवारीं. १

महामंगला पावना पुण्यभूमी
तिचे - राष्ट्रमाते, तुझे बाळ आम्ही,
तुझें नांव या सार्थ लोकीं करावें.
स्वयें उद्धरोनी जना उद्धरावें. २

बहू नेटका नीट संसार केला,
परी शेवटीं काळ घेऊन गेला;
अशा संस्कृतीची जनीं कोण गोडी.
धरी रे मना राष्ट्रसेवा न सोडी. ३

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP