मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
आहे बीज म्हणोनि आज तुजला ...

बीज - आहे बीज म्हणोनि आज तुजला ...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


आहे बीज म्हणोनि आज तुजला चंद्रा ! बघोनी मनीं
माझीही मगिनी असेल नयनें माझ्याकडे लावुनी,
आला कंठ असेल दाटुनि तिचा, नाना मनीं भावना
योवीनी असतील त्या करितही दु:खी तियेच्या मना.
ताई, भाऊ तुझाडि त्याच बघतो चंद्राकडे या क्षणीं;
आणोनी तव मूर्ति चित्तफलकीं उद्विग्न तोही मनीं.
कालें घोर दरी जरी पसरिली प्र्मामधें दु:खदा
प्रीतीनें परि एकरूपच असूं मी तूं पहा सर्वदा
घेवोनी करिं दीप, अक्षत तुवां चंद्राकडे फेकुनी,
भाऊ आज कुठें असेल म्हणतां जें होय तुझ्या मनीं,
तें तेथें ; परि गे, क्षणीं मम मनीं नेत्रांतुनी धांवती
हे अश्रू तुज तेच घालित असें ओवाळणी संप्रती

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP