घोडा घोडा - घोडा घोडा खेळु चला रे । म...
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.
घोडा घोडा खेळु चला रे । मौज घडीभर करूं चला. धृ०
घोडे शंकर विठू करा,
लगाम हातीं कुणी धरा,
दोरीचा चाबूक करा,
हां ! तर आतां पळा चला रे, घोडा घोडा. १
भले मुलांनो बसा जरा,
चित्त आपुलें शांत करा,
धांवत जाउं पुन्हा घरां रे, घोडा घोडा. २
गेलीं धांवत मुलें घरीं,
गंमत झाली घडीभरी,
आनंदहि चित्ता झाला रे, घोडा घोडा. ३
Last Updated : November 11, 2016
TOP