श्लोक
हें पांडुरंग नभ नील असोनि झालें,
अभ्रें तदीय शरिराप्रति वेष्टियेलें,
वाटे मना बहुत वृष्टि निशींत झाली,
ऐशा सुशांत अरुणोदयिं एक कालीं १
सकुतुक बघण्यातेम बाल उद्यान जाई;
श्रमुनि बनविलें जें पार्श्वभागास पाही.
सुकुसुमधर तेथें पाहुनी सल्लतांला
नयनसुखद झाला बाग त्या बालकाला. २
प्रियकरजलपातें मोद वेलींस झाला,
म्हणुनि जपुनि पर्णीं ठेविती त्या पयाला;
सहजच नगप्राप्ती त्यांस संतोष दे ती
बहुत रमवि बाळा तोयमुक्तावली ती; ३
निबीडतर पल्लवी टवटवी नवी लावरी
चढे अमृत वर्षले म्हणुनि मेघ वृक्षांवरी;
बहार नव पातला कितिक सल्लतांना तयें
नवी रुचिर कांति त्या चिमुक्रल्याहि बागेस ये. ४
येथें दुरून तंव एक मधूप आला,
जो मानसीं पिउनियां सुरभीस धाला.
आनंदवृत्तिस निसर्गचि लाट आली
बागेंत या चिमुकुल्या करि रम्य केली ५
राहे न निश्चल कुठें क्षण एकही तो;
विश्रांतिसौख्य नच अन्य (हि) भोग घेतो,
माधुर्यसौरभ सदा पिउनी रहातो,
काव्यांतरीं कवि जसा सुमनीं रमे तो. ६
पुष्पावरी बसुनिया क्षण एक संथ
राहे अधांतरिं मुखें रव मंजु गात;
शुंडा मृदू मग मधूप्रति आकळाया
पुप्पीं धरी वरि मधूस क्षणैक पेया, ७
बघुनि दंग मधूप फुलांवरी
पवन वाटत मत्सर हा धरी;
लववितो म्हणुनी स्वबलें लता
जरि नसे लव लाभहि कोणता. ८
स्वभाविकचि चंचला गति यदीय लक्ष्मीपरी
सुखांत असतां अहा ! स्वमनभंग झाला वरी,
गमे भ्रमर जाहला खचित त्यामुळें बावळा
नसे स्वमनभंगसे खचित दु:ख या भूतला ९
सुटे सुमन, आळवी भ्रमर काय गानें तया
वियोगधर शोधितो उपवनीं तदीय प्रिया,
दिसे न नयना कुठे म्हणुनि धीर त्याचा सुटे;
फुटे स्वमनिं कामवृक्ष न तयेंच कार्यीं नटे १०
सुपुष्प नव लाधलें पुनरपी जसें भेटलें
स्वपूर्वविधिच्या बळें हरित वित्त वाटे भलें.
अपार सुख मानवा गमत कीं तयानें जसें
दुजें कुसुम भेटतां भ्रमर मानसीं होतसे. ११
क्षणभरी मग गुंगत त्यावरी
दिसत मोद किती स्वमनीं धरी;
सुखविण्यापप्रति त्याप्रति गायनें
करित उच्चरचें मग बोलणें १२
बागेंत ज्याची सुमती रमे ती
कर्णीं मुलाचे रव मंजु येती;
होता जरी बंभर मात्र हो तो
बालास सदगानसमान होतो. १३
दृष्टी तयाची मग अन्य भाती;
सोडोनि झाली भमरा पहाती;
तेजस्विनी कृष्णपणा धरी ती,
कांती मुला वाटत तोषदा ती. १४
मधुग्रहण तो करी बघुनि बाल ती तत्कृती
धरोनि विपरीतता परिहि तापला निश्चितीं,
‘अहा अधम गांजिसी धरूनि दुष्टता मानसीं
फुलांस तरि नीच तूं कूति बरोनि हें दाविसी. १५
स्वशुंड सुमनास टोचिसि अहा सुईच्यापरी
खरा बहुत दुष्ट तूं कृति कथी तुझी ही खरी.
म्हणोनि तुज शासणें खचित योग्य वाटे मना
स्वरूप नच योग्यता मिळवि सत्कृतीच्याविना.’ १६
वदोनि इतुके करी कुसुमरक्षणा धावणें
सुशब्द तंव आयके, ‘नच छळी तया ताडनें,
अकार्य करण्यास तूं नच प्रवृत्त हो मुला !
नसे भ्रमर दुष्कृती स्वमनिं जाण गा हेतुला,’ १७
वदे कवण; पाहण्या करित वक्र द्दष्टी जरा,
बघोनि जननीप्रती क्षणिक जाहला लाजरा.
सुबोधरस त्याप्रती जननि जाहली अर्पिती;
मुलांस्तव तयांतलीं सुवचनेंच सांगेन तीं. १८
‘मुला, न म्हण टोचितो भ्रमर तो स्वशुंडा फुला,
पितो सुरस तो, गुणग्रहण सांगतो बा तुला;
धरोनि बहु मोद तो रस सदा जसा चाखितो
तसा पिउनि तुं भुले सुगुण मानसीं वांछितो. १९
गुणग्रहणमाधुरी सतत सेवितो त्यां कळे;
कळे न इतरांस ती कथुनि गोडवेही बळें.
सदा कमल सेवितो भ्रमर त्यावरी गुंगतो;
कशास, तरि काय हें स्वमनिं भेक जाणेल तो. २०
आर्या
सुगुणग्रहणार्थ झटे जरि पडले कष्ट त्यांत सोसावे;
नच सोडी कमलांतें भ्रमर जरी बद्धतेसही पावे.’ २१