माझा भारत - अंधारामधुनी प्रकाशकिरणें ...
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.
अंधारामधुनी प्रकाशकिरणें चैतन्य वाहोनिया
आणी भूमिवरी, अपार गमली सर्वेश्वराची दया;
माझा भारत एकलाचि तिजला हा पारखा जाहला,
शंका ये तुजला अशी तरि कशी आश्चर्य वाटे मला ! १
आहे हा हतभाग्य दीनदुबळा संत्रस्त दु:खी जरी,
दारिद्रथें जरि अस्थिपंजर उरे त्या तच्छरीरावरी,
त्याला पाहुनिया भिऊन दुसरे कोणी पळाले दुरी,
या दु:खीं परि प्रीति वाढत असे माझी तरी त्यावरी. २
आहे देव विभागिला सकल या विश्वांत चोहींकडे,
ते माझ्या हृदयांतरीं बसुनिया हे शब्द बोले पुढें.
‘नाहीं भारत दीन दुर्बल जरी माझा मला अप्रिय,
मी न्यायप्रिय देव वारिन पहा आतां तयाचें भय !’ ३
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP