भारद्वाजास - भारद्वाजा; विहगा माझ्या, ...
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.
भारद्वाजा; विहगा माझ्या, धन्य जगीं तूं मज गमसी;
फुलया बागा या तरुरांगा त्यावरतीं भरभर फिरसी.
सुंदर झाडी, पाणद मोठी, शीतल छाया तींत पडे;
वाढुनि वेली फुगदी झाली, त्यांतुनि ओढा वाहतसे.
भारद्वाजा, विहगा माझ्या, तूं वनराजा खरोखरी;
हिरवा मांडव सृष्टिदेवता तुजसाठी हा रम्य करी.
हीं वेलींचीं सुंदर सदनें रत्नमण्यांनीं भूषविलीं;
सौभाग्यें हीं वनदेवींनीं तुझिया चरणीं अर्पियलीं.
अपूर्ण
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP