पाऊस - थबथबली, ओथंबुनि खालीं आली...
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.
थबथबली, ओथंबुनि खालीं आली,
जलदाली मज दिसली सायंकालीं,
रंगहि ते नच येती वर्णायातें !
सुंदरता मम त्यांची भुलवी चित्ता,
व्योमपटीं जलदांची झाली दाटी;
कृष्ण कुणी काजळिच्या शिखरावाणी,
नील कुणी इन्द्रमण्यांच्या कानितहुनि,
गोकर्णीं मिश्र जांभळे तसे कुणी;
तेजांत धूमाचे उठती झोत,
चकमकती पांहुरही त्यापरिस किती !
जणुं ठेवी माल भरुनि वर्षादेवी
आणुनिया दिगंतराहुनि या ठाया !
कोठारी यावरला दिसतो तेथें;
पाहुनि तें मग मारुत शिरतो तेथें;
न्याहळुनी नाहिं बघत दुसरें कोणी
मग हातें अस्ताव्यस्त करी त्यातें.
मधु मोतीं भूवरतीं भरभर ओती !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP