वत्सलता - वत्सलतेनें चिमण्या बाळा त...
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.
वत्सलतेनें चिमण्या बाळा तुज वेल्हाळा पालवितें;
हृदयीं येई प्रेम दाटुनी त्यापरि पालख हालवितें.
निज निज बाळा - जीवभाव हा गहिवरुनी येई भरती;
प्रेमानंदें ! तुज गातां जणुं लक्ष कवि मनीं अवतरती.
सांठविलें जें मनीं आजवरि तेज तुझ्या वदनीं बघुनी
नको बघाया जनांत कोणी म्हणुनि झांकितें पदरांनीं.
निजनिज माझ्या प्रेमानंदा, मत्सुखकंदा. नीज गडे,
नातरि हृदयीं फिरुनि निजविण्या धडधड माझें चित्त उडे.
कसले कांहीं विचार बाई, मी तरि आई शोभतसें;
माझिच तुजला द्दष्ट लागली हाय मना भय वाटतसे.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP