मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
त्या उजाड माळावरती बुरुजा...

खेडयांतील रात्र - त्या उजाड माळावरती बुरुजा...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


त्या उजाड माळावरती
बुरुजाच्या पडल्या भिंती;
ओसाड देवळापुढतीं
वडाचा पार - अंधार दाटला तेथ भरे भरपूर.

ओढयांत भलु ओरडती,
वार्‍यांत भुतें बडबडती,
डोहांत सावल्या पडती,
काळ्या शार - त्या गर्द जाळिमधिं रात देत हुंकार.

भररानीं काकस्थानीं
उठतात ज्वाळ भडकोणी,
अस्मान मिळाले धरणीं,
आर न पार - अवकाळ रात्रिचा प्रहर घुमे तो धोर.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP