जीवित संशय जिकडे तिकडे - जीवित संशय जिकडे तिकडे जी...
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.
जीवित संशय जिकडे तिकडे
जीवाचें या कोड पडे
हृदय धडधडे । मेघ कडाडे
चित्तावरती वित्त जडे ।
चित्त भडकलें
दु:ख कहरलें
शून्य जहालें भ्रांतींत
विश्व प्रेममय
जीव प्रेममय
तत्व मनाला हें गवसे
हया तत्त्वाचा पाठपठण मी
करितां करितां जीव नवा
द्दष्टिस पडला
मनीं वाढला
घ्यास मना कां लागावा
मुखावरचे गुलाब फुंलले
फुलले झुलले तुझिया प्रेमाने
स्वैर तरंगीं
बनलें रंगी
तुझिये अंगीं तें गाणें
होईं जागा
दे मज जागा
अभागिनीला घे पदरीं.
(प्रसंग : एका निद्रिस्त तरुणाला त्याची प्रिया जागृत करण्यासाठीं म्हणते)
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP