मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
सृष्टि निमाली स्वर्गहि नु...

मंगलमय प्रेमकवन - सृष्टि निमाली स्वर्गहि नु...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


सृष्टि निमाली स्वर्गहि नुरलें,  प्रेम मात्र मंगलमय भरलें;
तेज हरपलें तम मालवलें,  उन्मनींत’ मन तन्मय मुरलें.
जागृति नव्हती, स्वप्नहि नव्हतें,  भाव मनोश स्फुरले तेथें;
सूरहि नव्हते, शब्दहि नव्हते,  गीतच हृदयंगम बनलें तें
सृष्टि पातली, स्वर्गहि आले,  तेज - तमांचें मीलन झालें
सूर उदेले, शब्द निघाले, विश्व कवन तें ऐकुनि धालें.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP