आर्यांची अवनति - हमालांचें जरि राष्ट्र असे...
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.
हमालांचें जरि राष्ट्र असे कोठें,
हिंदभूमी तो देश मला वाटे.
अहा ! पोटाची खांच भरायातें
कष्ट देवा पडतात किती त्यातें. १
आंग्लविद्येच्या अध्ययनामाजीं
अहा सुकते तारुण्यकळी ताजी;
तेज गेलें. सामर्थ्य नष्ट झालें,
दीन दुर्बल विज्ञन घरा आलें. २
लग्न झालें, संसार गळां आला,
देह केवळ राहिला विकायाला.
एक चिंता धन केविं पडे हातीं,
अन्नवसनाची केविं सरे भ्रांती. ३
क्षणीं विद्येची होय धूळधाण,
तयासंगें हो तीहि हमालीण,
पौरुषाचा मग सहज अंत झाला,
गोड मानी मन त्याच हमालीला. ४
स्वार्थ परमार्थासवें साधणारी,
दिव्य संजीवक पौरुषाधिकारी
स्वोन्नतीचा सत्पंथ दाविणारीं,
कुठें विद्या ती आत्मगर्वहारी ? ५
अपूर्ण
Last Updated : November 11, 2016
TOP