मूढ मालती - प्रेमर्तूच्या मरुदगणांची ...
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.
प्रेमर्तूच्या मरुदगणांची पहिली लहरी आली;
हृदयीं शिरली मुग्ध मालती, ईषत्कंपित झाली
तेंच रूप तें, द्दष्टि तीच ती, माधवही तो पहिला,
आज निराळा परंतु गमला त्या वेडया हृदयाला;
वेडे वेडे विलक्षणचि या आज भावना काय ?
पुसूं कुणाला ? जिकडे तिकडे भरले माधवराय.
मंद वायुंनो. शपथ तुम्हांला गुणगुणतां तें काय ?
मृढ मालती ! नाहीं नाहीं, बोलत माधवराय.
हृदय गडे धडधडे ! कशाच्या लहरी येती अंगीं?
जागी का मी, काय बोलत्यें, बसलें कोण्या जागीं ?
अमृतमयी स्वर्धारा त्यांतचि शशांक पोहत आहे’
नि:श्वासांची उष्ण झरी का मदहृदयांतुन वाहे.
पलिकडचें हें मेघाडंबर धांबत येइल बाई,
दिव्य चंद्रिके, विचार असले नकोत भलते कांहीं,
स्वर्ग स्वर्गीं तेजोमय, तूं वसुधा दीन विचारी;
मूढ मालती तशी माधवा तुजसाठीं झुरणारी.
आर्द्र करावें विश्व अश्रुंनी दूषविल्या श्वसितांहीं,
स्त्रीहृदया ! तुज मार्गच दुसरा जगीं नसे बा कांहीं.
जर बातांना भाव मनींचे हृदय कसें होतें तें,
निश्वसितें तीं, तीं प्रेमाची मुकीं कोंवळी गीतें,
फुलें अहा तींप्रेमतरूंचीं लाजविती स्वर्गातें..
गर्द वनांतिल मुक्या झरीपरि तिची प्रेममय वृत्ती
स्वर्गंगेला लाजविणारी दिसती अवकाशीं ती.
पेमकल्पनामय प्रेमाचा सेतू अदभुत कांहीं,
दिसला असता जो कोणीही कधीं पाहिला नाहीं.
कुमारिकेच्या मूक मनाच्या स्निग्ध सांवळया छाया
दिसल्या असत्या जरका येते विचार अबलेचे या -
अपूर्ण
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP