मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
आली भाऊबिज म्हणुनिया हर्ष...

दु:खी भावाची बीज - आली भाऊबिज म्हणुनिया हर्ष...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


आली भाऊबिज म्हणुनिया हर्षती लोक सारे,
माझ्या चित्तीं परि उसळतें दु:खहि हें कसें रे !
गेली ताई, किति तरि वरी काल लोटोनि गेला;
नाहीं दु:खा क्षय, नव गमे आठवीतां मनाला. १

दादा, दादा; किति मधुर हो शब्द होता तिचा तो.
शुद्ध प्रेमें सतत भरला मूर्त आनंद कीं तो.
होता, गेला; हरहर परी मृत्युदाडेंत गेला
ताईसंगें उडुनि गगनीं तो कुठें नष्ट झाला. २

गेली ताई स्मृति परि तिची मानसा जाळिते ही
गेल्या बीजा मधुर, उरली आज ही कष्टदायी.
आतां स्वर्गीं पुढतिं मजला काळ नेईल जेव्हां,
ताईसंगें करिन अपुली बीज मी सत्य तेव्हाम ३

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP