मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
निजला होता क्षीरसागरीं पर...

तेजोवीणेची रागदारी - निजला होता क्षीरसागरीं पर...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


निजला होता क्षीरसागरीं परेश विश्वंभर;
निजलें होतें विश्व धुंदिनें, धुंद दिसे अंबर,
जागी होती दिव्य देवता एक मात्र त्या क्षणीं;
छेडुं लागली रागदारि मग तेजोवीणेंतुनि,
सकंप रव तो ब्रम्हकपाटीं मंद घुमूं लागला;
हळूं ह्ळूं ये नवी चेतना दिव्य विश्वमंडला.
निशेंत विरला तम:प्रसर, ती लीन रवीच्या करीं,
रविकर होती लीन अंबरीं, अंबर परमेश्वरीं.
परेश तोही लीन जाहला या गाण्याभीतरीं;
तो गाण्याचा सूर सांठला वसुधेच्या अंतरीं,
आला, आला, आला गडि हो जगासंगतीं कवि;
आला, आला देव, तयाही आदिशक्ति जागवी.
करुं चला जयघोष तियेचा पहिला मानच तिला,
उदो उदो सौंदर्यदेवते, विश्वगोल बोलला.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP