लहान मुलास उपदेश - कौमारप्राप्ती तुज होत बाल...
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.
कौमारप्राप्ती तुज होत बाला तूं बाल्य टाकूनि कुमार झाला
या सदूगुणांतें स्वमनीं धरावें कौमार्यकार्याप्रति आचरावें १
ईशें दिला मानवजन्म तूतें जें इच्छिसी तें परिपूर्ण होतें
याचें तुवां सार्थक बा करावें राखून कीर्ती जगतीं उरावें २
इच्छा प्रभूची स्वमनांत जाण कां दीधला मानवलजन्म जाण
कर्तव्या आहे जगतांत तूतें जाणूनि घेईं स्वमनीं मुला, तें ३
खावें फिरावेंहि सुखी रहावें कर्तव्य कां हेंचि तुझें असावें
हे तो क्रिया आचरती पशूहि रानांत स्वार्थे बसतात तेही ४
ते तों पशू, मानव तूं सुजाण त्यांच्याहुनी श्रेष्ठ असा असून
एकाच पंथें जरि चाललांत कां ठेविला भेद तरी तयांत ५
तूतें प्रभूनें दिधली सुबुद्धी द्रव्यार्जनातें न मुळींच बा ती
व्हावें तुवं वंद्य जगांत तिन्ही यावीण त्याच्या न मनांत कांहीं ६
जे दाविले मार्ग जनीं सुसृतें शोधोनिया नीट तपास तूं तें
जो सज्जना मार्ग पसंत वाटे जाई मुला, तूं हित त्याच वाटे ७
विद्यार्जनीं वेंचुन सर्व काळ तूं सर्वदा कुमार्ग टाळ
विद्या असे पूज्य जगत्रयीं ही विद्या तिथें सदगुणसंच राही ८
विद्येविना या जगतांत शून्य विद्येविना पूज्य नसेचि अन्य
विद्यासे संकटसाहयकारी विद्याच वा दुर्व्यानास वारी ९
कलादर्श, नोव्हेंबर १९३४
Last Updated : November 11, 2016
TOP