मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
जगाचे बंध कोणाला - जगाला ...

कवीची इच्छा - जगाचे बंध कोणाला - जगाला ...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


जगाचे बंध कोणाला - जगाला बांधला त्याला;
मला जो थांबवी ऐसा - जगीं निर्बंध ये कैसा ?
जगानें देह हा केला - जगाला वाहिलें त्याला;
हणा मारा खुडा तोडा - परी आतां मला सोडा.
न कीर्तीला, न प्रेमाला - न सौख्याला, विलासाला,
न विघ्नाला, न मृत्यूला - मला ये आडवाय़ाला ?
वृथा या वाहणें चिंता - वृथा अश्रु वृथा ममता;
वृथा नि:श्वासमालाही - मला जी थांबवीना ही.
पुरे संबंध प्रेमाचा - नको हा खेळ पेमाचा
खरा जो प्रीतिचा प्याला - जगीं सुखी झाला.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP