मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
१ मत्काव्यदेवते येईं तळम...

कवितेस - १ मत्काव्यदेवते येईं तळम...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.



मत्काव्यदेवते येईं
तळमळतों गे तुजसाठीं
तूं सरिता प्रेमळ माझी,
दे भेट तुझ्या दासाला;
आत्मा हा व्याकुळ झाला.
कां त्यजिसी मज मीनाला ?
तुजविषयीं ध्यास जिवाचा,
त्वदरूपीं रमली वाचा,
ये, पुरवी छंद मनाचा,
जग नको तुझ्याविण त्याला - (दे भेट तुझ्या दासाला ध्रु०)

धुंडिलें विश्वभर तूंतें
रानींवनिं भटकत फिरलों
अश्रूंसह हृदय गळालें
दु:खांनीं कावुनि गेलों,
लाधेना ठाव कुठेंही;
लाधलीस परि तूं नाहीं’
चिंतेनें चित्त मिळालें;
तुजसाठीं वेडा झालों;
कोठें न परी तूं कांहीं,
तगमगही थांबत नाहीं;
दु:खां मन मोजित नाहीं;
उद्युक्त तुला बघन्याला - (दे भेट तुझ्या दाआला ध्रु०)

परि आतां गिरिशिखरें हिं
हे उदधी उग्रकराल
आडवें पथीं हें आलें
हे सर्प विषारी त्यांत
पसरलीं सभोंतीं घोर
भिवविति मज वारंवार;
तम माज्या हाय अपार,
मजवरी करिति फूत्कार,
अवघडलें आतां येणें
आशांचीं झालीं स्वप्नें.
नैराश्य मानसीं बाणें,
सांगं हें दु:ख कुणाला - (दे भेट तुझ्या दासाला)

या उदास जगतीं सार्‍या
‘प्रेम तूं’ उडोनि जातां
तुं सांग मला ‘मी येथें
तुजवांचुनि मजला कोण ?
मग काय इथें राहून ?
आलोंच पहा’ धांवून;
हा काळ संपला जेथें,
क्षण वास न औदास्यातें.
प्रेमाविण पाश न जेथें,

तूं असशिल त्या स्थानाला. - (दे भेट तुझ्या दासाला)

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP