मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
१ रागोबा आला, आला, गडे आम...

रागोवा आला - १ रागोबा आला, आला, गडे आम...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.



रागोबा आला, आला,
गडे आमुच्या ताईला,
फुगले ग फुगले गाल,
फुल झालें माझें लाल.
धांनुनि ही आली, आली;
गंगायमुनेसह खालीं.

ताई बाई सोनुकले,
तूं तल माझें फूल गले !
जा गे सगळ्या दूर चला.
राग फुलाला या आला
गेला गेला राग अहा !
हंसली ताई, पहा पहा !

हंसली ग हंसली ताई,
हें फलहि हंसलें बाई,
उनपाउस हीं एक गडे
एक ताईचें हंसें - रडें
राग ताईचा हारवला;
चला चला खेळायाला.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP