मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
उग्र कडेच्या कडे तोडुनी व...

वीर मराठा - उग्र कडेच्या कडे तोडुनी व...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


उग्र कडेच्या कडे तोडुनी वीर बालिका वननिर्झरिणी
पुन्हा एकदां बळुनी बघते स्वाभिमान द्दष्टीनें जेथें,
त्याच तिच्या सुंदर बळशावर विंध्यशिरापरि भव्य भयंकर
विश्वरक्षणा जणूं उदेला, दुर्ग दिसे अभिमनच पहिला.
उच्च उच्च तत्सौधावरतीं धीर गभीर प्रसन्नमूर्ती
वीर मराठा कुमार कोणी बधे सहज पलिकडच्या रानीं १

भयाण दरडी घोर कर्‍हाडी किर्र दाट अंधारी झाडी;
कृष्ण राक्षसी शिला पसरती गर्द मातल्या गवतावरतीं.
ढासळलेले कडे भयंकर तुटूनि घसरले परस्परांवर;
त्यांत चेपला वननिर्झर तो कालभुजगासम सळसळतो.
कृष्ण भयानक तीं गिरिशिखरें, त्या खिंडी, तीं रानभुयारें,
विरूपाक्ष कालाचें तेथें भेसुर रूप दिसे न कुणातें ? २

काळमुखीं पण बावरणारा रणदेवीचा पंचीप्यारा.
वीर्याचा अतिरेकच नुसता वीर बाल तो कुमार होता.
रणक्षेत्र तें बघुनीं नयनीं प्रस्फुरला विर्याग्निकणांनीं;
ज्योत नवी फोफावुन झाली लाल लाल वदनावर आली.
द्दष्टींतुनि फूत्कारच ओती उग्र नागिणी मनस्विता ती;
रणदेवीचा हृदयमणी तो, खोल विचारीम यापरि झुलतो. ३

शूरवीर समरांगणगाजी निजपूर्वज बघतो तो आजी;
तीं मैदानें प्रदेश सारा साज अपूर्वच दिसतो त्याला.
बघतां बघतां नटला बाळ काळ दुजा बनला विकराल;
तोंच कळेना कुठुनी कसला एक मंद नि:श्वास उदेला.
स्वप्न चळे ? वरतीं मग पाहे निशावात घोंघावत आहे;
प्रकाश गेला, संध्या गेली, रात्र उदेली विचार जालीं. ४

रणक्षेत्र ते कडे विशाल वाढविती रेवेचे बोल.
घूं घूं घूं मंत्रांची मालाघुबड लागलें बोलायाला,
वन्य पशूंचे भेसुर नाद दुर्गावर घेती पडसाद,
कसा कळावा त्यतुनि त्याला एक मंद नि:श्वास उदेला ?
श्रवणरंधिंर परि अझुनी घुमतो मारुतचेष्टाभास मात्र तो.
बालवीर क्षण चंचल झाला.
रणदेवीचें. प्रीतिस्थान कर्कश रणधीरांचे प्राण ५

मजसाठी झरणार्‍या श्वासा, दाब आंतल्या आंत उसासा.
समोर दिसतें रणस्थान तें, हृदय नाचतें अमुचें तेथें,
शौर्यासाठीं शूरापोटीं रणांगणाच्या घ्याया गांठी
रजपूताचे आम्ही छावे, मरण - मारणें आम्हां ठावें.
प्रेमभुकेलें असेल कोणी, पहा सोधुनी, जा त्या स्थानीं,
मी समरीं रणशूर बनोनी इच्छितसें खडगाचें पाणी. ६

पाणी पाणी, जलमय सारा आसपासचा पर्वत झाला;
धो धो धांवति निर्झर खालीं, दरी दरी धोधोमय झाली.
कृष्णवर्ण घनपर्वत वरतीं काळकृतान्तापरी विचरती;
कडाडती चपला त्या घातें स्वर्भूमी क्षण दुभंग होते.
काळोखाचें काळिज फुटलें, किर्र रात्र अंधारीं बोले;
कसला पर्वत, कसलें रान, एक मात्र अंधार भयाण. ७

दुर्ग गजबजे, बसल्याथापा, घोडयाच्या ट्पटपल्या टापा;
वीर मराठे दिसले, लपले; निस्तब्ध पुन्हां कानन डोले.
कृष्णरात्रिची भयाण वेळ, रान सभोंतीं जड जंजाळ;
शौर्यदेवता परी नाचते कदयाकडयांतुनि जेथें तेथें,
हादरीत जड पर्वत सारा घो घो घुमताहे हा वारा;
त्याच निनादें बसुनी टाळी प्रतिध्वनी हो भयद निराळीं ८

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP