अश्रुमाळ - ही अश्रूंची अखंड माला । म...
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.
ही अश्रूंची अखंड माला । म्हणो कुणी ही तुला कशाला;
परंतु कळतें माझें मातें । अश्रुमाळ ही जें मज देते.
रडण्यावांचुनि । कुढण्यावांचुनि
त्या हास्याचा अक्षय पेला । जगीं कधीं या कुणा मिळाला ?
मिथ्यास्वप्नीं रमवुनि वृत्ति । जगीं हासते मानवजाति,
परंतु ज्यानें जागें व्हावें । त्यानें रडणें जवळ करावें.
उदासीन हें । रडणें नोहे
या चढल्या अश्रूंची माला । दाखविते चढत्या आशेला.
निंदा कोणी या रडण्याला । हसो कुणी तें त्यांचें त्यांना;
परंतु अक्षय मी रडणार । स्वर्गाच्या माडया चढणार.
मानवतेची । भूक आमुची ।
सवाल करिते या रडण्य़ांत
अपूर्ण
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP