शाहीर - शूर वीर सरदार मराठी मानकर...
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.
शूर वीर सरदार मराठी मानकरी मंडळी,
पाठ भाटा वर्णिती जयाची उदार बिरुदावली.
धीर धिंग रणसिंग बैसले नरनायक त्यामधीं.
ऐटदार जरतार आपल्या भर पोषाखीं सुधी.
सौंदर्याची वेल बहरली, ठरली उजवीकडे;
राजबाळ वेल्हाळ बघत अळुमाळ पावलांकडे.
वीर्य सारसर्वस्त्र जयाचें विशाल वक्ष:स्थळ
नाथ तिचा तो सनाथ करि जणुं अनाथ भूमंडळ,
नवा युवा वनराज केसरी सलील बसला जसा
ठाणमाण मांडुनी, तयाचा तसाच उठला ठसा ?
थाटदाट थाटला सभेचा थाप डफावर बसे,
ताल धरी खंजिरी, तारिचा झणत्कार होतसे.
‘उदो उदो !’ जयधोष घणघणे चकित जाहली सभा,
वीर्याचा नटनाच प्रीतिचा रोमांचावर उभा.
चित्त थरकलें, प्रेम थरकलें, वीर्य हरखलें अहा !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP