प्रतापसिंह - हा अंत:कलहाग्नि घोर पडला,...
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.
हा अंत:कलहाग्नि घोर पडला, पृष्ठें जळालीं किती !
रक्ताचे ठिपके भयंकर निजद्वेषें किती गाजती !
स्वार्थाचें अति तीव्र खडग पडुनी चित्रें किती कापिलीं !
झालीं कृष्णकभिन्न दैवलिखितें, ही स्त्रैणता हो बळी.
क्रुंद्धा ग्रंथसमीक्षणीं भरतभू हुंकार फोडी बळें,
गेला पेटुनि विंघ्यपर्वत पहा तद्दिव्यघोषानलें !
विश्वेशप्रिय विश्वधूरि - असुरां दुर्दांत निर्दाळुनी
दिव्यात्मे निजले तयावर तया चैतन्य ये त्या क्षणीं.
झाले ते रजपूत पूत करण्या दिव्यध्वजा भारतीं
तो निर्धोष प्रतापसिंह अमुचा मार्तंड चंडाकृति ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP