मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
पाहत लाहूं - गोदिला ग माध...

माधा भाऊ - पाहत लाहूं - गोदिला ग माध...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


पाहत लाहूं - गोदिला ग माधा भाऊ.
केंवा हथतो, केंवा ललतो.
हात पहा हा कथे हलवितो
घेतो कांहीं ताकुनि देतो,
माधा भाऊ - गानें का तुदला गाऊं ? १

बाहुलि का खेळाया व्हावी ?
लबाड कांहीं बोलत नाहीं;
हाथत हाथत कैथा पाही ।
माधा भाऊ - तुद कलेवली का घेऊं ? २

पहा कथा हा आई, हथतो.
माधे केथ कथे बघ धलितो,
लागलीच मग थोलून देतो,
तल ले भाऊ - खेलन्याथ आपन दाऊं ३

चिमणीचा घरटा चोरिस गेला

चिंव्‌ चिंव्‌ चिंव्‌ रे । तिकडे तूं कोण रे ?

‘कावळे दादा, कावळे दादा, माझा घरला नेलास, बाबा ?’
‘नाहीं ग बाई, चिमुताई, तुझा घरटा कोण नेई ?


‘कपिला मावशी, कपिला मावशी, घरटें मोडून तूं कां जाशी ?’
‘नाहीं ग बाई, मोडीन कशी ? मौऊ गवत दिलें तुशीं’

‘कोंबडी ताई, कोंबडी ताई, माझा घरटा पाहिलास बाई’
‘नाहीं ग बाई, मुळीं नाहीं तुझा माझा संबंध कांहीं’

‘आतां बाई कुठें ? जाऊं कुठें ? राहूं कुठें ?’
‘गरीब विचार्‍या चिमणीला सगळे ट्पले छळण्याला.’

‘चिमणीला मग पोपट बोले कां गे तुझे डोळे ओले ?’
‘काय सांगूं बाबा, तुला ? माझा घरटा कोणी नेला ?’

‘चिमृताई, चिमूताई, माझ्या पिंजर्‍यांत येतेस, बाई ?’
‘पिंजरा किती छान माझा ! सगळा शीण जाईल तुझा’

‘जळो तुझा पिंजरा मेला ! त्याचें नांव नको मला !’
‘राहीन मी घरट्याविना !’ चिमणी उडून गेली राना.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP