मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
कोठुनि येते मला कळेना उदा...

उदासीनता - कोठुनि येते मला कळेना उदा...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


कोठुनि येते मला कळेना
उदासीनता ही हृदयाला.
काय बोंचतें तें समजेना
हृदयाच्या अंतर्‍हृदयाला.
येथें नाहीं तेथें नाहीं.
काय पाहिजे मिळवायाला ?
कुणीकडे हा झुकतो वारा ?
हांका मारी जीव कुणाला ?
मुक्या मनाचे मुके बोल हे
घरे पाडिती पण हृदयाला.
तीव्र वेदना करिती. परि ती
दिव्य औषधी कसली त्याला !

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP