जिज्ञासु - हे योगीशा, मोहमूढ मी नर द...
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.
हे योगीशा, मोहमूढ मी नर दुर्बल दीन,
आनंदाच्या मागें वणवण दमलों भटकून १
अपूर्णतेनें पूर्ण निराशा हृदयाची होते;
अमृत मुखाशीं नेतां नेतां विषमय हो येथें. २
आनंदाच्या भारानेंही दुखणारें चित्त,
दु:ख बघुनि मग नवल न त्याचे तुकडे होतात. ३
खराखुरा आनंद असे कीं सर्वच आभास ?
पडतें कोडें लागे वेडें चित्त रडायास ! ४
उदास जीवन कंठायातें मग कांहीं नाहीं
भूलभुलाई तत्त्वज्ञांची शोधुनिया पाहीं. ५
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP