मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
‘या घुमत्या,’ रात्रीचा वा...

वीरगडी - ‘या घुमत्या,’ रात्रीचा वा...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


‘या घुमत्या,’ रात्रीचा वारा घुमवूं दे तुमच्या हृदयाला
वीर्यश्रीचें अपूर्व पाणी विरांना ! निधडया छात्यांनीं
याच झर्‍यापरि पसरुनि द्या रे कडयावरूनि चोहिंकडे खालीं
जों तेजाची दिव्य तुतारी प्रतापनिधि घुमवीत निराळीं,
तोंच आपुल्या खडगतलांनीं शत्रुरक्तमय बनत्रा अवनी.
कचेल जो - पण नांव कशाला, पुरे हाच संदेश तुम्हांला,
कडकडणार्‍या चपलेवाणी वीरमणीची गभीर वाणी
नाचनाचुनी कडयाकडयांत तेजाची संचरवी ज्योत.
काळवेळ, परि कसलें काय, वीर पुन्हां परते असहाय,
साहय कशाला ? विलसे हातीं रिपुरुधिरप्रिय खडगलता ती.
क्षणाक्षणात्या दुर्गामधुनी दीप तळपतो लपतो विपिनीं;
विजा चकमती, प्रगटे रान, गर्द भरे अंधार फिरून.
दरड गयंकर वरतीं आली, रिपुसैन्याचा पडाव खालीं.
मार्ग संपला, चुकला घोडा, वीर थरकला मनांत थोडा;
अन्यक्षणिं नवकांति उसळली अग्निकणांपरि नयनीं गालीं.
निमिषार्धी सरसावुनि हात नाचुं लागलें खड्ग नभांत;
अंधेरी परि भलती झुकली. द्दष्टि विरमली ठकली थकली.
गुप्त रिपूच जडला, भिडला वीराच्या हृदयाशीं भाला;
दबा धरुनिया बसला छावा, वीर केसरी खवळुनि यावा,
त्यापरि तो उसळुनिया वीर जों घाली अरिवर तरवार,
तोंच मधें टंकार उदेला खडगाचा खणखण रव झाला.
किंकाळी श्रवणावर आली, पुढें निनादें बसलीं टाळी;
स्तब्ध वीर न्याहाळित तेथें भूवर तों पडलेलीं प्रेतें.
भास दिव्य हो क्षणैकनयनीं तोंच उठे नि:श्वास दुरोनी.
दिर्गामधुनी उसळुनि आला एकजात सरदारी भाला;
पलिकडच्या अत्युग्रकडयांत रणवाद्यांचा उठला धोत.
मागें पुढती एकच मारा, शत्रु गजबजे क्षणांत सारा;
वीर पुरा बनला बेहोष, क्षणाक्षणा गर्जे रणघोष.
धन्य वीर व्हा पुढतीं, पुढतीं, पाहुं बरें काळाची छाती.
भंग भंगुनी हो धुळधाणी, शुगुदलाचे जिरलें. पाणी.
वीर्यश्रीचा नवरा गाजी बेभान चरे समरामाजीं;
शत्रुदलाचा कोट अफाट चिरित चालला तसाच थेट.

रातकिडयांच्या कठोर गानीं बेभानपणा भरला रानीं;
कडयाखालच्या उभ्या कपारीं पाणथळीच्या गलिच्छ भारी;
त्यांमधुनी घोंघावत गीतें सैराटपणें उठलीं भूतें;
भालूंचें विव्हळणें चाले, कुठें पिंगळा भकास भूतें;
कुठें खिदखिदे दरीच वाटे, रान करकरे भयाण मोठें.
क्षणीं भारिला पुतळ्यावाणी वीर जशाचा तसाच रानीं,
मृत्यु - प्रीती मृत्य - प्रीती नाद भयंकर नभांत होती;
दर्‍या कपारीं वनेंहि सारीं नाचुं लागलीं घनांधकारीं.
अग्नि पेटला उठल्या ज्योती, भग्न हास्य ये भकास चित्तीं.
भग्न रवें आरडोनि कोणी क्षणीं धबधबा उरास हाणी;
मगरापरि बासुनिया तोंडें गरगर होते घेत भवंडे;
किंकाळ्या फोडितलवलाही पिशाच्चमाला अद्दश्य होई.

अपूर्ण

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP