मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
शून्य मनाच्या घुमटांत कसल...

शून्य मनाचा घुमट - शून्य मनाच्या घुमटांत कसल...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


शून्य मनाच्या घुमटांत
कसलें तरि घुमतें गीत;
अर्थ कळेना कसलाही,
विश्रांती परि त्या नाहीं’

वारा वाही,
निर्झर गाई,
मर्मर होई,

परि त्याचें भीषण भूत
घोंघाबत फिरतें येथ.
दिव्यरूपिणी सृष्टि जरी
भीषण रूपा एथ धरी;
जग सगळें भीषण होतें.
नांदाया मग ये येथें;

न कळे असला,
घुमट बनविला,
कुणी कशाला ? -

अपूर्ण

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP