मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
दोष असती जगतांत किती याचे...

दोष व प्रीति - दोष असती जगतांत किती याचे...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


दोष असती जगतांत किती याचें
नसे मजला सामर्य्य गणायाचें;
दोष माझा परि हाच मला वाटे,
दोष बघतां सत्प्रेम कसें आटे ?
दोष असती जगतांत, असायाचें;
प्रेमगंगेच्या शुद्धसिंचनेंहि
शुद्ध होइ न जो, दोष असा नाहीं;
गडया पूर्णा ! मज आस तुझी नाहीं.
सख्या न्य़ूना ! ये मार मिठी देहीं,
प्रीति माझ्या हृदयांत करी वास.
न्यूनतेला पूर्णत्व द्यावयास !

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP