मी सांगून चुकते कान्हा
कर सोड मला हे दांडगेपण सोसेना ॥ध्रु०॥
जळो दह्यादुधाची चोरी ।
हें काय म्हणावें दिवसां धरसी पोरी ।
या कर्मे पडशील घोरी ।
पति वाट मला तूं करुं नको बळजोरी ।
धुंडून गोपिका गोरी ।
तिशीं गुलाल खेळसी होरी ।
तुझि उडेल अशानें थोरी ।
तूं जाण तुझें हे कर्म मला भावेना ॥१॥