मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
ऐक सखे गडणी कुंजवनी ह...

रामजोशी - ऐक सखे गडणी कुंजवनी ह...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


ऐक सखे गडणी कुंजवनी हरि खेळतो बसलीस निज भुवनी ॥ध्रु॥

या वनांत नंदाचा नंदन करी आनंद याच भवता अरविंदाचा ।

बाई तशांत रंगाचा संगम यदुपति अंग भिजवितो बहार अनंगाचा ।

गडे रसनंद लालाचा लाल गळ्यामध्यें लालभडकला लोळ गुलालाचा ।

बाई लपेट पवनाचा नाचतचि अवतंस करीशी शिरीं सुंदर सुमनाचा ।

तूं अशांत झडकरी उठ गडे अग रंगाची होतसे लूट नको हरीशी

पांडुं तूट ।

तो कन्हैया केवळ बुट घे गुलालाची भरमुठ घरच्यानी दिधली सूट ।

थो तननननननन वेणु खाचा ध्वनी मंजुळ वाणी ॥ऐक सखे० ॥१॥

सखे गुलाब पिचकारी धरुनि करीं हरी मुग्ध गोपिका हळूच चुचकारी ।

करी कौतुक कंसारी असें पाहशील हरिशीं खेळशील सुख तरी संसारी ।

विरहीणीस तरवारी कारंजाचे फ़वार धारा सुगंध तरवारी ।

बाई मधुकर वनचारी कुंजातचि गुंजारव करिती हरिमुख संचारी ।

तो अनंत गिरीधारी चंपक बकुल कुसुम सुर वर्षति नभिहुन अवधारी ।

मी आतांची आले चाल तुज वाहतसे नंद लाल कां सोडुन बसलीस बोल ।

करुं नको जिवाचे हाल श्रीहरीचे पदघन मालरंग लूट झाली काळ ।

तुज हरिचा लागो ख्याल छुं छुं ननननननन पुर चरणी । नाचती गौळणी ।

ऐक सखे गडणी ॥२॥

त्या सखिने गोपिला अति प्रयत्नें रिझवून नेलें तिला चौसोपिला ।

पाहतांच हरि तिजला कवटाळुनि धरि काय तिचा तो वसनांकित भिजला

मग अनंग वळविला त्याच गोपीने यदुपति रंगी धरुनि मळविला ।

निजकामचि पुरविला हरिपद पंकज विलोकुनी तो स्वमान नुरविला ।

रतिरास रंग सरला अनंत कवि जन वर्णिती परि वर्णोय परि जगीं उरला ।

कोण जाणे त्याचा पार तो अनंतधरी अवतार वेदाला न कळे सार ।

करी नागेश वेडे चार तें स्वरुप तरि अनिवार धोंडी शाईर संग गुलजार

थररररररर कांपति रिपुजन लागती तच्चरणी ॥ ऐक सखे गडणी ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP