या हरिसाठीं मी जाहले पहा वेडी ॥ध्रु०॥
वाटे घनश्याम माझ्या डोळ्यापुढे बाई ।
प्रपंचात जिव नाहीं करुं तरी काई ।
लौकिकाची रीत सारी गेली त्याचे पायीं ।
गेला बाई सोडुनि कुठे पाहूं गांव खेडीं ॥१॥
त्याचे काय जाई जिथे गेला तिथे राजा ।
आम्ही मूढ याच्या नादी पराव्याच्या भाजा ।
गरीब बाई गोपी यांच्या आला नाही काजा ।
आहे ऐकतों रांड कुणी मिळविली तेडी ॥२॥
सासु आणि सासर्याची वाइट मी झाले ।
याच्यामुळें दादल्याला कधीं नाहीं भ्यालें ।
लौकिकाची चाड नाही अपवाद प्यालें ।
कविराय हाच याचा उपकार फ़ेडी ॥३॥