मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
सोड सोड पदर मुलगिचा ज...

रामजोशी - सोड सोड पदर मुलगिचा ज...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


सोड सोड पदर मुलगिचा जळो तुझी अशि कशी ही होरी ॥ध्रु०॥

रांडा काय गोकुळी उण्या मुलगी अति नाजुक माझी रे ॥

लोळविली रंगामध्यें दांडग्या नरतनु कीं भाजी रे ॥

जन्मलासि यदुच्या कुळीं म्हणूनि कां तुज होतिल राजी रे ॥

किती लाल गाल पोरीचा, वाचली होती बळकट दोरी रे ॥

सोड ॥१॥

रंग लाल भरुनि पिचकारी मुलीचे किती भरशील डोळे रे ॥

जी रांड दांडगी तिच्या उरावर धर जाउनि गोळे रे ॥

केशर गुलाबही तुझा थंड, हो परि गरतीस पोळे रे ॥

तूं जार चोर पोरटा आम्हावरी करशी बळजबरी रे ॥

सोड ॥२॥

कुंकुमें उडविली उरीं जरि, चिमणी माझी मरती रे ॥

काय घेऊं गोंवळ्या तुझे आयुष्याची मग होती भरती रे ॥

अबरुची सोनी, अशा काय नांदाव्या गरती रे ॥

मातलास गोकुळापुरीं अशि काय कविराया थोरी ॥

सोड ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 17, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP