मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
झाली तरुणपणाची धूळ । ...

रामजोशी - झाली तरुणपणाची धूळ । ...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


झाली तरुणपणाची धूळ ।

पति नाहीं सेजेवरी सुंदरा रडे मुळमूळ ॥ध्रु०॥

हा वसंतऋतु अनिवार करि मदन शरांचा मार बहुत बेजार ।

आता काय करुं मी संसार सर्पापरी गमती गडे गळ्यामधें हार ।

जासुद करति वेरझार नाहीं पत्र साजणी कथितें तपसिलवार ।

या विरहसमुद्रापार कधीं होईन बाई येति कधीं सरदार ।

॥चाल॥

काय करुं मंचकी बसून नाहिं सर्व सौख्य मज असून ।

बोलूं कुणासवें मी हंसून अंतरळा साजण आला बाई मजला दिसून ।

मीं चित्त पाहिले बहुत तयाचें कसून ।

ओढवलें दैव आता तयाचें कसून ।

ओढवलें दैव आता काय तयावरी रुसून ।

॥चाल॥

बाई सर्व सुखाचें मूळ

तो दिलभर मजला होईल कधीं अनुकूळ ॥१॥

सजणाविण झालें दीन जसा तप्त वाळूमधें तळमळतो मीन ।

काय सांगूं संचितहीन नाहीं सये वर्तमान वर्षे झालीं तीन ।

बाई झाले दु:खाधीन आतां देह तयाचे चरणावर ठेवीन ।

कधीं नेत्र भरुन पाहीन हा विलास त्याविण मजला देतो शीण ।

॥चाल॥

नार पतिविण कसि बरि दिसल पर पुरुष घरामधिं घुसल ।

मग स्वकीय जन हा हसल हा शुध्द भाव जरी माझें मनिंचा असल !

तरी सजण सखे मज लौकर नयनीं दिसल ।

नातरी तो परनारीसीं गुंतुन फ़सल ।

॥चाल॥

एवढ्यावर न कळे खूळ ।

पिंगळा सकाळीं शुभ वदला पांगुळ ॥२॥

अशि नार पड्ली शोकांत मग तिच्या सखीने कवळून धरिला हात ।

म्हणे काय करिशी घात जाईल सखे तुज आज सुखाची रात ।

हा ध्वनी पडतां कानांत उघडिले नेत्र तों जासुद उभा द्वारांत ।

घाबरली पुसे हुजुरांत कुणीकून आली हो काय सुखाची मात ।

॥चाल॥

स्वारि आली बयाजी कडक बागांत उतरले भडक ।

हें ऐकुनि झाली रंग सडक हर्षानें भेटली सजणाला बेधडक ।

हरि संकट हहि नउयास बैसली धडक टाकून दे कलगी व्यंकट

पतीला हुडक ।

लिंब रसासीन टाकुनि गुळ ।

धोंडि शाहिर कविचा छंद उरावर शूळ ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP