हा हरि माझ्या ख्याली कां पडला ।
हा हरि काय बोलू ओंगळ मेला ॥ध्रु०॥
साथि मिळउनि दहिदुध हरितो ।
माती टाकुनि डोळे भरितो ।
रातीं येउनि छाति धरितो ।
जातिगोति हातीं वाईट म्हणावया बाई भला ॥१॥
याचि नगरी बाई सोडून जावें ।
या घोरानें कितिकीं झिजावें ।
पापविषयीं कुणि पुढें व्हावें ।
पोटिं ओटीं खोटी बोली करीत
निशिदिनीं रागचि आला ॥२॥
बाळपणा पुत्र रांडा पटवी ।
याला लागली नाहीं कुणि सटवीं ।
या वस्तीहुनि बरी की ग अटवी ।
पोरी टोरी गोरीं काळी सार्या
पाहुनि कविराया बाला ॥३॥