बोलूं तरी काय रे सांवळिया मी ॥ध्रु०॥
येशी जाशी माझी सासू ।
मोठी बाट आहे सासू ।
किती वेळ जारा धरुं पाय रे ॥१॥
दाऊनिया खोट्या रंगा ।
झोंबशी तू माझ्या अंगा ।
नको तुझ्या वादा ऊठ जाय रे ॥२॥
खोटे कर्म संसारी ।
बरें नव्हे कंसारी ।
यदुवशी केला कीर्तीचा शिराडा ।
दुजे नाही काम गेला कुब्जेच्या वराडा ।
येऊं नये दारा कविराय रे ॥३॥