यशोदेबाई मूल तुझा अनिवाळ ॥ध्रु०॥
जितक्या गोपे तितक्या टकळी ।
म्हणसी तूं चिमणा बाळ ॥१॥
धन्य अशाला व्यालिस गाई ।
गोप वधूचा काळ ॥२॥
गोकुळ नगरी कसे नांदावें ।
कांहीं न उरला ताळ ॥३॥
पाहुनि वाटतो घातुक यापरी ।
बरवा काळा व्याळ ॥४॥
तुज लडिवाळा कविरायाचा ।
जातो कैसा चाळ ॥५॥