या भवांत सुख पाहसी हे काय ॥ध्रु०॥
श्रम दिननिशीं किती करसी ।
कधीं हरिपदगंगेत नाहासी ।
मन करुनि सुमन कधिं वाहसी ।
हरिपदिं होऊनी गाय ॥१॥
हितवती नरतनु विफ़ल गमावुनी ।
भुललासि किती तरी वैभवविपिनी ।
फ़टफ़ट निशिदिनीं खटपट व्यर्थचि जाय ॥२॥
नटशिल किती जनीं अभिमान उभा मनीं ।
कधि होसी नम्रपणी शरण कविराय ॥
या भवांत सुख पाहसी हें काय ॥३॥