जाऊं नको रे विषयाटवीची वाट कठिण मोठी ।
नागविले किती भले गड्यांनो असंख्य जनकोटी ॥ध्रु०॥
याच वनामधिं भिल्ल नांदतो कामनाम त्याला ।
पंचशराने विश्व मोहिलें ठाऊक सकळांला ।
कामक्रोधादिक सांगाती जिंकिती काळाला ।
नितंबिनी वागुरा पसरल्या कामि कुरंगाला ।
॥चाल॥
भजा तुम्ही निशिदिनीं देवाला ।
हेचि निदानीं येईल कामाला ।
दया नाहींच निर्दय मदनाला ।
॥चाल॥
सरक सरक तूं पडूं नको गहनी दुर्ममता खोटी ।
हरिमायेचा खेळ कळेना टांगिल उफ़राटी ॥जा० ॥१॥