मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
मनुजा सुखदायक हरिला गा...

रामजोशी - मनुजा सुखदायक हरिला गा...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


मनुजा सुखदायक हरिला गावें । तत्पदी लागावे ॥ध्रु०॥

लटिका संसृतिचा मोह नसावा । निज देह कसावा ।

सारा जगदाकृति तोच दिसावा । मनिं भाव वसावा ।

कामादिक अरिचा गर्व पुसावा । तरी तुला विसावा ।

कारे व्यर्थची या भवीं भागावें । तत्पदी० ॥१॥

दारा सुत यांचा तुजवरी दंगा । धरु नको कुसंगा ।

बापा का भुलसी वरल्या रंगा । गजरत्न तुरंगा ।

अंगावरी घेशील काय अनंगा । हित जाईल भंगा ।

त्याच्या कीर्तनी सतत जागावें । तत्पदी ॥२॥

त्राता नर नारायण संसारीं । मग भोंदु सारी ।

एवढा भवसागर भरला भारीं । स्मृतिमात्रें तारी ।

कैचा करुणाकर हा अवतारी । निजमनी विचारी ।

किती रे कविराय तुला सांगावे । तत्पदी ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP