या मदनें मज गांजिलें करुं तरि कैसें ॥ध्रु०॥
मज एकटीला टाकुनि गेला विरहानळें बाई भाजियलें ।
या मदनें मज गांजियलें ॥१॥
शुकपिक वैरि वाटती यांणिं ठकवुनियां विष पाजियलें ।
या मदनें मज गांजियलें ॥२॥
मज निवटावें कविरायाच्या होतें ह्रदयीं डागिजेलें ।
या मदनें मज गांजियलें ॥३॥