तनु दारोदार भरणाच्या भरीं गेली ॥ध्रु०॥
किती रांडाच्या प्रेमाला भाळलासी ।
जन कामाच्या बाणाने पडे फ़ासी ।
धनधामाच्या लोभाने लया जाशी ।
त्त्वां नरजन्मी आपुली सोय न केली ।
तनु दारोदार भरणाच्या भरीं गेली ॥१॥
सुख भोगाया लागसी भवाच्या पाठी ।
हित नोहे बाही खरी विषाची वाटी ।
सावध करितो मानवा तुला यासाठी ।
दुर्मोहानें अरे कशी तुझी मती नेली ।
तनु दारोदार भरणाच्या भरीं गेली ॥२॥
मन सुमन करुनिया हरीच्या पदीं वाही ।
नाही तरी हे बा तुला बुडवितील साही ।
आपुल्या जागां तूं बरे विचारुन पाही ।
कविरायाला आवड भक्ति रंगेली ।
तनु दारोदार भरणाच्या भरीं गेली ॥३॥