मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
अग सखे यशोदेबाई मूला ...

रामजोशी - अग सखे यशोदेबाई मूला ...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


अग सखे यशोदेबाई मूला आपला आटोपी ।

अशानें उडवील हा टोपी ॥ध्रु०॥

काय वदूं जाहाली सीमा । तुझे गोकुळ सोडावे ।

किती तरी अपयश जोडावे । भल्याचा मुलगा ।

यानें गरतीस ओढावें । आतां काय कपाळ फ़ोडावें ।

जळो ही कटकट अग गडे ।

नित कित करावी वटवट ।

पोरीला चुंबितो मटमट ।

ही सलग नोहे सोपी आमुचे पती आहेत कोपी ॥१॥

ही पुरे आता तुझी वस्ती काय उरली जिंदगाणी ।

नांदतो परी लाजिरवाणी ।

आज नंदाची म्हणविशी मुख्य राणी ऐक

लोकांची गार्‍हाणी ॥

असा हा बिजवर अग सये ।

सोशिले गडे आम्ही आजवर ।

ही आली घोरपड तुजवर ।

चालत्या निघून गोपी तुझा सुत दधि दुध वोपी ॥२॥

अग बये करावी हाकमी धणी याने रीतीची ।

अशी काय वहिवाट नीतीची ।

ठेऊन दे दासी अगे बये पाहुनिया सुरतीची ।

गोष्ट काढूं नये गरतीची ।

बरी काय खळखळ ।

अग अशी रयतेची न घ्यावी कळकळ ।

लोटितो घडी एक पळपळ

कविराया न गुण लोपी गातसे ऐकुनि तरी चापी ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 16, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP