मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
बा काय घालिसी संसृतिचा...

रामजोशी - बा काय घालिसी संसृतिचा...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


बा काय घालिसी संसृतिचा पिंगा ॥

या मानव देहीं भज रे श्रीरंगा ॥ध्रु०

चौर्‍याशीशि लक्ष हे फ़ेरे फ़िरुनि सारा ॥

बा आलासि येथें नरतनु संसारा ॥

हे पुत्र कुणाचे कन्या आणि दारा ॥

ही काय मिळविसी भवताली बारा ॥

अविवेक सुटला तुफ़ान हा वारा ॥

बा कसा उतरशिल भवांबुधि पारा ॥

स्त्री म्हणशिल माझी तरि ते परावी ॥

बा सन्मति आतां कधिं रे धरावी ॥

हे विषयवासना मनींची नुरावी ॥

यासाठी सांगतो धरी सज्जनसंगा ॥

हो सावध नातरि काळ करिल दंगा ॥ बा काय ॥१॥

या जगी पसरली श्रीहरिची माया ॥

तूं म्हणशिल माझी तनुसुत धन जाया ॥

भ्रांतिने तपेले पहाशी बुडवाया ॥

ही पुन्हां मिळावी तुला कुठून काया ॥

या आशातृष्णा मिळूनी आया बाया ॥

तुला पाहती सफ़ई बुडवाया ॥

ही रांड दुराशा नको रे धनाची ॥

धरि लज्जा कांहीं आपुल्या मनाची ॥

दुर्दशा प्रपंचामधिं रे जनाची ॥

हा लोभ देहिंचा सुख बाहेर अंगा ॥

बा आंतुन लागला काळ भिरड भुंगा ॥ बा काय ॥२॥

परिणाम आपुला होईल हा कैसा ॥

हे ज्यास कळेना तो नर पशु तैसा ॥

तुज कामुक लोभ स्त्रीचा जो ऐसा ॥

ते वंचक म्हणतिल मंचकी हो बैसा ॥

हें हाड उगाळुनि जिस देशिल पैसा ॥

ती तुला मानिते निज सेवक जैसा ॥

बा मुक्ति तुझ्याही घरची बुडाली ॥

साधुजनामध्यें पतही उडाली ॥

अविवेकें सन्मति सगळी दडाली ॥

मृगपद हे टाकुनि करिं घेशिल हिंगा ॥

कविराय चतुर परि कलि पडला बिंगा ॥

वा काय घालिशी संसृति ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP