मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
बाई यशोदे बाळ तुझा ता...

रामजोशी - बाई यशोदे बाळ तुझा ता...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


बाई यशोदे बाळ तुझा तान्हा ।

तुला वाटे परी नष्ट मोठा कान्हा कान्हा ॥ध्रु०॥

काल माझ्या घरी शिरुन दुध प्याला ।

हातीं धरिला परि जरा नाही भ्याला ।

मूल कशाचा भीती नाही याला ।

हाचि झाला या गोकुळांत राणा राणा ॥

बाई०........ ॥१॥

इवायंथा निन्न मगा भूमीदल्ला ।

इष्ट पापिष्टा केळ नोडु दिल्ला ।

निन्न गोकुळके भ्यंकी हाचुवल्ला ।

इवा निन्न बदली तान्हा तान्हा ॥

बाई०.......... ॥२॥

अरे शौकन सुन नंदजी की प्यारी ।

थारु लंगरवा माकु देत गारी ।

गयी अबरु सबरती बिगर डारी ।

यही धूम मची कान्हा कान्हा ॥

बाई०........ ॥३॥

त्त्वं तु मातेयं पुत्रतापि धन्या ।

वरं पुत्रायादृशा दंभ कन्या ।

कुले नानामि कापि रतिरन्या ।

हे सन्त इति मात: कविरायधियो नाना नाना ॥

बाई०....... ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 17, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP