मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
सुंदरा मनामध्यें भरली ...

रामजोशी - सुंदरा मनामध्यें भरली ...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


सुंदरा मनामध्यें भरली जरा नाहीं ठरली हवेलित शिरली

मोत्याचा भांग ।

अरे गड्या हौस नाहीं पुरली म्हणोनि विरली पुन्हा नाहीं फ़िरलि

कुणाची सांग ॥ध्रु०॥

जशी कळी सोनचाफ़्याची न पडु पाप्याची दृष्टी सोप्याची

नसल ती नार ।

अति नाजुक तनु देखणी, गुणाची खणी उभी नवखणी चढुन सकुमार ।

जशि मन्मथ रति धाकटी सिंहसमकटी उभी एकटी गळ्यामध्यें हार ।

अंगि तारुण्याचा बहर ज्वानिचा कहर मारिते लहर मदन तलवार ।

पायी पैंजण झुमकेदार कोणाची दार ?

कोण सरदार हिचा भरतार ?

कुलविद्याजडा व टिकली मनामध्यें टिकली नाहीं हटकिली तेज अनिवार ।

नाकामध्यें बुलाख सुरती चांदणी वरती चमकति परति हिच्यापुढें फ़ार ।

चालते गड्या गजाची चाल लड सुटली कुरळे बाल किनकाप अंगीचा लाल

हिजपुढें नको धन माल शोभवी दिठोणा गालं हिला जरि गाल-

विषय भोगाल फ़िटाल तरि पांग ।

ही शुध्द इंदुची कळा मतिस नाकळा तर वाकळा न हिजहुन चांग ।

सुंदरा मनामध्यें भरलि जरा नाहीं ठरली० ॥१॥

सुंदरी मूर्ति मदनाची अमृत वदनाची मदन कदनाची विखारी धार ।

बाहुली कामसुत्रांत मदन नेत्रांत कोक-शास्त्रांत निपुण ही फ़ार ।

शुक पिक यांणि धरिली लाज जहालें वाज कंठी आवाज विण्याची तार ।

ही मन्मथ नवरस हवा काय पहावा बूट वाहवा सफ़ल संसार ।

कचघनांत सौदामिनी दिवस यामिनी जपावी मनीं कीं नकळे पार ।

वेणींत मुदराखडी कोर चोखडी माडीवर खडी विडा रंगदार ।

मणि कुसुम कर्ण शोभवी मतिस लोभवी मला तर थवीं वाटली सार ।

नव्हे सुगंधा पौढ बाल दाविते तरुघोताल जित कंबुक तिचें-

नाल अप्सरा उणी गुणवान ।

वाटली मदन करवाल काय करवाल ? कसे ठरवाल ? हिचें कनक आंग ।

धाकुटी म्हणून कैंकांची तुम्ही ऐकाची हिणे कैकांची उतरली भांग ।

सुंदरा मनामध्यें भरली जरा नाहीं ठरली० ॥२॥

भुजबंद छंद नग नवा बसविला जवा तंत ताजवा न बहु नगभार ।

त्रिवळी तळीं कांची दाम मौक्तिकोद्दाम हिचा दरदाम जाणतो मार ।

नखिं नखिं मेदि रंग लाल अंगठी वर लाल बहुत गुलजार चमक हिल्लाल ।

सोन्याचे पायजिबतळी की मदन पुतळी टाकि भूतली मंजु झुंमकार ।

सुंदरि म्हणसि बाहेर हिचें माहेर कुठे घरदार ।

ती उभी जवळ तिची बटीक चढून जा हटकी बोल चाल ठीक-

माडीवर वार ।

दैवाने घ्यावी लाधली नार बाधली बहुत साधली विरळ कुणिवार ।

या परिं होऊनि बेताल तो तरुणही कुनका बाल ।

पुरविला मनाचा ख्याल हा दर्द कठिण बेताल ।

म्हणुनि टाकाल नाहक बहकाल सुरस रोखाल कुठून मग सांग ।

कविराय चमकला हीर लोकजाहीर इतर शाहीर काजवे वांग ।

सुंदरा मनामध्यें भरली जरा नाहीं ठरली

हवेलिंत शिरली मोत्यांचा भांग ॥३॥


References : N/A
Last Updated : February 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP